आमची संस्था 2010 पासून कार्यरत असुन स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था आहे. समृद्ध जीवन प्रतिष्ठाण हे एक असे केंद्र आहे जे विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करून स्पर्धा परीक्षांसाठी सुसज्ज करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आला आहे. आमच्या मार्गदर्शनाचा उद्देश विद्यार्थ्यांना फक्त पाठांतर न करता, समस्यांच्या सोडवणुकीसाठी तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी प्रेरित करणे आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा स्पर्धात्मक भवितव्य सुरक्षित राहील.
मागील 14 वर्षपासुन संस्था MPSC, Banking, IBPS, Railway, LIC, SSC, Police & Militory Training अश्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करत असुन आतापर्यंत 1000 पेक्ष्या जास्त विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
समृद्ध जीवन प्रतिष्ठाण ही महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI), पुणे आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI), पुणे यांचे मान्यताप्राप्त अधिकृत प्रशिक्षण केंद्र म्हणून कार्यरत आहे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.
आमचा प्रयत्न विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण देऊन त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक तांत्रिक कौशल्ये व ज्ञान प्रदान करणे हा आहे.